केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या ; उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारकडून नव्याने प्रयत्न केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेद्रं मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने आणलेला अध्यादेश, नेमलेला गायकवाड आयोग, विधीमंडळात केलेला कायदा, सुप्रीम कोर्टात सरकारने दोन वेळा याबाबत केलेले प्रयत्न याची माहिती पंतप्रधानांना पत्रातून दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्रं मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं. मराठा समाजाला केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण देण्याची मागणी नरेंद्र मोदींकडे या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13 टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्राने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button