दादा, अगोदर आधी गाव आणि जिल्हा सांभाळा !

Hasan Mushrif & Chandrakant Patil
  • हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

कोल्हापूर :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर या मूळ  गावात ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला. उद्या भाजपचेच (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना म्हणतील, दादा, तुमच्याच गावात तुमची सत्ता नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी चंद्रकांत पाटील यांना सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना लगावला. गल्ली, गाव, तालुका आणि जिल्हा सांभाळा, अन्यथा पराभवासारखी अवस्था होते, असा सल्लाही मुश्रीफ यांनी पाटील यांना दिला.

मुश्रीफ म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने बाजी मारली. तसेच राज्यभरात भाजपच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला. नेत्यांनी गल्लीपासून पुढे सांभाळून काम केलं पाहिजे. गाव, गल्ली, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र राखला पाहिजे. अन्यथा पराभव होतोच. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कल पाहता महाविकास आघाडीचा कारभार जनतेला आवडला आहे हे स्पष्ट होते. यंदा प्रथमच निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी बोगस दाखले काढून निवडणूक लढवली जात होती. त्याला या प्रकारामुळे लगाम बसला आहे. निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केल्याची घोषणा केल्यामुळे यंदा मतदानाची आकडेवारीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER