रोहित पवारांमध्ये आजोबांची छबी; विविध उपक्रमांद्वारे यशस्वी राजकीय पाऊल!

Sharad Pawar & Rohit Pawar

जामखेड : जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राजकीय कारकिर्द सुरू केल्यानंतर प्रत्येकवेळी ते यशस्वी पाऊल टाकताना दिसून आले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एवढेच नाही तर समाजातील छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे, समाजाची, विशेषतः भावी पिढी, युवकांच्या गरजा ओळखून तसे उपक्रम राबवणे अशा कामामुळे रोहित पवारांना राष्ट्रवादीतील त्यांच्या चाहत्यांकडून भावी शरद पवार अशी उपमादेखील मिळाली आहे.

नवनवीन उपक्रम राबवणे, लोकांत मिसळणे, काही ना काही कार्य सुरू ठेवणे, लोकांच्या ओठावर आपले नाव सतत येत राहील असे कार्य रोहित पवारांचे सुरूच असते. आता रोहित पवार यांच्याच संकल्पनेतून आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आयोजित कर्जत-जामखेड मतदार संघातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींसाठी ऑनलाइन ‘पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण’ घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाकडुन राज्य पोलीस दलात १२ हजार ५३८ जागांची भरती करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पुर्ण केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.

गृहमंत्र्यांनी संबंधित अधिकारी वर्गाला त्याबाबत सुचनाही दिल्या आहेत. पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवक युवतींसाठी आघाडी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड तालुक्यातील युवक-युवतींना ही मोफत संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणात लेखी परिक्षा व शारीरिक क्षमता चाचणी अशी तयारी करून घेण्यात येणार आहे.लॉकडाउनच्या काळात लेखी परीक्षेतील मराठी, अंक गणित,बुद्धिमत्ता चाचणी तसेच सामान्य ज्ञान या विषयाचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

राज्यातील तज्ञ मंडळी हे मार्गदर्शन करणार आहेत.या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित युवक-युवतींनी आपली नोंदणी करणे अनिवार्य असुन https://bit.ly/2fuz2P G या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा उपलब्ध करण्यात आलेल्या QR CODE वरूनही नोंदणी करता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER