आजोबांसाठी नातू मैदानात ! शरद पवारांच्या पत्रावरुन टीका करणाऱ्या विरोधकांवर रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar - Sharad Pawar

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीत पंजाब आणि हरयाणातले शेतकरी आंदोलन करत आहेत. विरोधकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे .यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऑगस्ट २०१० मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षि (Sheila Dikshit)त यांना लिहीलेल्या एका पत्राचा दाखला देत, विरोधी पक्षांच्या दुटप्पीपणावर टीका केली.

शरद पवारांचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपा नेते पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या आजोबांसाठी मैदानात उतरत भाजपाला (BJP) सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवार पोस्टमध्ये म्हणाले की , केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसादजी यांनी कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारचा बचाव करण्यासाठी पवार साहेबांनी शिवराज सिंह चौहान तसेच शीला दीक्षित जी यांना लिहिलेल्या तत्कालीन पत्रांचा दाखला दिला आहे. या पत्राचा संदर्भ देताना पत्राचा पहिला परिच्छेद वाचला जात आहे, परंतु पत्राचा पुढील भाग मात्र टाळला जात आहे.

पत्र पूर्ण वाचले असते तर कदाचित ते पत्र कुठल्या कायद्याच्या संदर्भात लिहिले गेले आहे ते देखील कळले असते, आणि २००७ च्या मसुद्याचा नियमांचा अभ्यास केला असता तर कदाचित शेतकरी आंदोलन का करीत आहे? आणि त्यांच्या मागण्या काय आहेत? हे देखील समजले असते. केलेले कायदे बरोबरच आहेत, चुकीचे नाहीत, मागे घेण्याचा प्रश्नच नाही हा केंद्र सरकारनं आपला इगो बाजूला ठेवायला हवा आणि विरोध कशासाठी हे समजून त्यावर उपाय काढायला हवा”, अशा शब्दांत बाजू मांडली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER