मुक्ताईनगरात खडसेंची जादू; भाजपची दाणादाण

BJP - NCP Eknath Khadse

जळगाव : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या निकालात अनेकांनी आपला गड राखण्यात यश मिळवले तर अनेकांना घरच्या मैदानातच पराभूत व्हावं लागलं. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासमोर भाजपची (BJP) दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयी गुलाल उधळला.

काहीच महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर ग्रामपंचायतीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यामुळे मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. निवडणूक काळात खडसे जरी आजारी असले तरी रोहिणी खडसे यांनी सगळं नियोजन हातात घेत उत्तम कामगिरी बजावून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयी गुलाल उधळला आहे. मुक्ताईनगरमध्ये थेट खडसे समर्थक विरुद्ध भाजप अशी सरळ सरळ लढत होती. मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ खडसे समर्थकांची जादू पाहायला मिळाली. तालुक्यात भाजपचा पूर्णपणे धुव्वा उडाला. तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने आपला झेंडा रोवला. तर केवळ ८ ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत पॅनेल विजयी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER