विदर्भात मनसेचे इंजिन सुसाट

MNS

यवतमाळ :- ग्रामपंचायत निवडणूक निकालात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) इंजिन दुपारनंतर जोरात धावायला लागले आहे. यवतमाळमध्ये तर मनसेला घवघवीत यश मिळाले आहे. येथील वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील १५ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या १५ ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापूर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे. (MNS get major success in gram panchayat election results 2021) याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही मनसेने खाते उघडले आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी गावात मनसेने शिवसेना-भाजप युतीला धूळ चारत विजय मिळवला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील खैरी-सावंगी-वाढोणा ग्रुप ग्रामपंचायतीमध्येही मनसेनं एकहाती विजय मिळवला आहे. पक्षानं ७ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत.

या ग्रामपंचायतींवर फडकला मनसेचा झेंडा

  • सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीमधील ७ पैकी ५ जागांवर मनसेने विजय मिळवला.
  • अहमदनगरच्या शिरसटवाडी ग्रामपंचायमध्ये मनसेचे ९ सदस्य विजयी
  • अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील खैरी-सावंगी-वाढोणा गट ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे  ७ पैकी  ७ उमेदवार विजयी
  • आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये ७ पैकी ६ जागांवर मनसे विजयी झाली आहे.

ही बातमी पण वाचा : घासून नाय, तर विरोधकांची ठासून ! मनसेने  ‘या’ ग्रामपंचायतींवर फडकावला विजयाचा झेंडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER