ग्रामपंचायतींचे धूमशान : कोल्हापुरात ९.२९ लाख मतदार बजावणार हक्क

Gram Panchayat Elections

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat) दि.१५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ९ लाख २९ हजार ८७७मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी १३ हजार ९३९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. एकूण १ हजार ४९२ प्रभागातून ४ हजार २७ सदस्य निवडून दिले जाणार आहेत.

१३,९३९ याकरिता १ हजार कर्मचाऱ्यांची ७८१ मतदान केंद्रांवर नियुक्ती आहे. या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया होणार ३२० निवडणूक निर्णय अधिकार्यांची, ५२ राखीव, तर ४१० सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दोन ग्रामपंचायती देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडील अव्वल कारकून आणि मंडल अधिकारी यांच्यासह पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, सहकार आदी विभागांतील अधिकाऱ्यांच्याही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER