घासून नाय, तर विरोधकांची ठासून ! मनसेने ‘या’ ग्रामपंचायतींवर फडकावला विजयाचा झेंडा

Raj Thackeray

मुंबई : राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर आज निकाल जाहीर होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली होती. निवडणूक निकालात इतर पक्षांची घौडदौड सुरू असताना मनसेला दिलासा देणारे निकाल समोर आले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.

या निवडणुकीत मनसेनं शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारत विजय संपादित केला आहे. काकोळी ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली. यात मनसेनं युतीच्या उमेदवारांचा पराभव करत ग्रामपंचायतीवर कब्जा केला. ग्रामपंचायतीत मनसेचा नगरसेवक विराजमान होणार असून, ७ पैकी ४ जागा पक्षानं जिंकल्या आहेत.

सर्व विजयी  उमेदवारांचं पक्षाच्यावतीनं अभिनंदनही करण्यात आलं आहे. आपले ‘मनसे’ अभिनंदन! घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतमधील  ७ पैकी ४ सदस्य विजयी!- अशा शब्दात मनसेनं नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER