परळीत धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा सिद्ध केले ; राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय

Dhananjay Munde

मुंबई : कथीत बलात्कार प्रकरणावरुन समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाही त्यांच्यावरच परळीकरांनी विश्वास दाखवला आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे(Dhanajay Munde) यांच्या गटाला मोठ यश लाभले असून इथल्या ७ पैकी ६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे.

परळी हा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असून इथल्या एकूण ७ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतींवर त्यांच्या गटाने अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने अवघ्या महाराष्ट्राचं परळीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. धनंजय मुंडे यांच्यावरील कथीत बलात्काराचे आरोप आणि त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत केलेल्या खुलाशावरुन राज्यात बरीच चर्चा झाली. मात्र, त्याचा परळी ग्रामपंचायतीच्या निकालावर काय परिणाम होते याकडे सर्वांची नजर होती. मात्र, या निकालाने परळी धनंजय मुंडेंचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER