भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

BJP - Mahavikas Aghadi

औरंगाबाद :- पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. आघाडीच्या या निर्णयाने भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. आता महाविकास आघाडी सरकारला ‘एकीचे बळ’ लक्षात आलेले दिसत आहे. कारण भाजपला (BJP) रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरु करण्यात आली आहे. गावागावात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचंच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर 618 ग्रांमपंतायतींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या रुपाने एकत्र लढणार आहे. तशी माहिती महाविकास आघाडीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ग्रांमपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळालं तर अनेक गावातील राजकीय समिकरणे बदलणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपच दुःख समजू शकतो, पण महाराष्ट्राला त्रास देणं चालणार नाही; संजय राऊतांचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER