कराडमध्ये भाजपची एकहाती सत्ता, पृथ्वीराज चव्हाण यांना जबर धक्का

कराड : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल घोषित होत आहे. अनेक ठिकाणी निकालाचे विभिन्न कल पाहायला मििळत आहे. कुठे प्रामुख्याने या निवडणुकीत भाजपने कुठे कुठे आघाडी घेतली याकडे अनेकांचे लक्ष होते.
कराडमध्ये कॉंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबर धक्का भसला आहे. येथे भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.

ग्राम पंचायत निवडणुक ही मोठमोठ्या नेत्यांसाठी खूप महत्वाची आहे. हे नेते जरी थेट निवडणुकीत उतरलेले नसले तरीही त्यांची पॅनेल ही जिल्ह्यात वर्चस्व कोणाचे हे ठरविणार आहेत. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाने जोरदार धक्का दिला आहे. शेनोली शेरेगावात भाजपाने विजय मिळविला आहे. राज्यातील विविध भागातील ग्राम पंचायतींचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला निकाल जाहीर करण्याचा मान हा कोल्हापूरला मिळाला आहे.

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील कोळकी गावचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कोळकीच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वत: लक्ष घातले होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी पॅनल उभे केले होते मात्र असे असताना देखील भाजप पुरस्कृत श्रीराम पॅनेलच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. या ठिकाणी भाजपची सपशेल हार झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या उमेदवारांना जरी यश आले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER