कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शक्य

Gram Panchayat elections

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संपत आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Election) घेण्याची संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील १२६ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला अशा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar)यांच्याकडून निवडणूक आयोगाने माहिती मागवली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे, तसेच मुदत संपलेल्या कोणकोणत्या ग्रामपंचायत मध्ये किती कोरोनाबाधित रुग्ण आहेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये किती ग्रामपंचायती आहेत. त्या भागात सद्यपरिस्थितीत निवडणुका घेणे शक्य आहे का? याविषयीची माहिती आयोगाने मागविली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER