ग्रामपंचायत निवडणूक : मतमोजणीला सुरूवात, शिवसेना आणि भाजपची आघाडी

BJP,Shivsena.NCP, Congress

मुंबई : राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सध्या निकाल जाहीर होतअसून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना (Shivsena,) आणि भाजपला (BJP) आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका (Gram Panchayat elections) जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला निकाल सकाळी पावणे नऊच्या सुमारास जाहीर झाला. हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलने पाडळी गावात विजय मिळवला. आज,

ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी तुरळक हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी राज्याच्या विविध भागांमध्ये होईल. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात २६,१७८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.

ग्रामपंचायतींची निवडणूक ही पक्षीय पातळीवर किं वा पक्षांच्या चिन्हावर लढविली गेली नसली तरी राजकीय नेत्यांना आपला पाया भक्कम करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER