ग्रामपंचायत निवडणूक : गुलाबराव पाटलांच्या गावात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना’

Gulabrao Patil

जळगाव : शिवसेनेचे नेते व राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांच्या पाळधी खुर्द गावात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी केल्याने शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shiv Sena) असा थेट सामना होतो आहे. ‘विकास’ आणि ‘परिवर्तन’ पॅनल एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

गुलाबराव पाटील यांनी गावातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरले. परिणाम असा झाला शिवसेनेचेच गट आपसात लढत आहेत.

शिवसैनिक आमने सामने

पाळधी बुद्रुक हे गुलाबराव पाटील यांचे मुळगाव आहे. या गावाचाच दुसरा भाग असलेल्या पाळधी खुर्द गावातील ग्रामपंचायतची निवडणूक होते आहे. दोन्ही गावांमध्ये गुलाबराव पाटील यांचे (शिवसेनेचे) वर्चस्व आहे. असे असतानाही गुलाबराव पाटील यांना पाळधी खुर्दची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले. शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

जळगाव जिल्ह्यात ७८३ ग्रापंची निवडणूक

जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या ५ हजार १५४ जागांसाठी मतदान होते आहे. जिल्ह्यात ५ हजार १५४ जागांसाठी १३ हजार ८४७ उमेदवार रिंगणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER