माळशिरस ग्रामपंचायत निकाल ; मोहिते पाटील गटाचे वर्चस्व कायम, भाजपची घौडदौड

gram-panchayat-election-results-2021-bjps-mohite-patil

पंढरपूर : माळशिरस तालुक्यावर पुन्हा एकदा मोहिते-पाटील गटाचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. कारण माळशिरस तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटाचा हा विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आणि भाजपसाठी मोठा विजय ठरला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटानं सत्ता कायम राखली आहे. त्याचबरोबर विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा निकालही जाहीर झाला आहे. विठ्ठलवाडीमध्ये 7 पैकी 7 ही जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटानं आपला झेंडा फडकावला आहे. या विजयानंतर उमेदवारांनी विजयी रॅली काढली. माळशिरससह पंढरपूर आणि सांगोल्यातही भाजपची विजयी घोडदौड पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER