भाजपचा दावा : सहा हजारांहून जास्त ठिकाणी भाजपचा झेंडा फडकेल

Keshav Upadhye

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर-१ चा पक्ष ठरला. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींपैकी सहा हजारांहून जास्त ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा दावा भाजपने केला आहे. भाजपचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मंगळवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचा दावा केला.

ही माहिती खोटी नाही. मी आकडेवारीच्या आधारावर हा दावा करत असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले. आतापर्यंत कोकण म्हणजे शिवसेना असे समीकरण होते. मात्र, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने हे समीकरण मोडून काढले आहे. सिंधुदुर्ग, वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे.

कोकणातील ७० पैकी ५५ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा केशव उपाध्ये यांनी केला. आकडेवारी बघता भाजपला सर्वांत जास्त मते मिळाल्याचेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER