शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मैदान मारले तर भाजप दुसऱ्या स्थानावर

Shivsena

मुंबई : राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल (Grampanchayat Result) सोमवारी जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत पहिले स्थान पटकाविले आहे . भाजपा (BJP) दुसऱ्या क्रमांकावर असून, काँग्रेसच्या जागांपेक्षा विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे.

राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. परिणामी सर्वच राजकीय पक्षांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला जातो व या वेळीही तसाच दावा सर्वपक्षीयांनी केला होता. १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपा व महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. अखेर निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे.

१२,७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ३ हजार ११३ जागां जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमाकाचा पक्ष ठरला आहे. भाजपानं २ हजार ६३२ जागा जिंकल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी २४०० जागांसह तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनंही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER