अशोक चव्हाणांच्या गडात काँग्रेसला शिवसेनकडून तगडे आव्हान

नांदेड :- नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने (Shivsena) आपले उमेदवार मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे राज्यात हातात हात घालून चालणारी महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी स्थानिक पातळीवर एकमेकांशी दोन हात करताना दिसत आहे.

काँग्रेसचा (Congress) मजबूत किल्ला म्हणून अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड गावाची ओळख आहे. त्यामुळेच मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे याच भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुनील देशमुख हे काँग्रेसचे पॅनल प्रमुख असून त्यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

शिवसेनेने बारड गावात काँग्रेसच्या विरोधात आपले उमेदवार मैदानात उतरवले आहे. तब्बल आठ हजार मतदार या गावात आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. सातत्याने काँग्रेसकडे असलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते.

ही बातमी पण वाचा : ‘शिवसेना आता पश्चिम बंगालमध्ये मोठा रेकॉर्ड करेल’, फडणवीसांचा खोचक टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER