ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची बाजी

sharad pawar and devendra fadnavis

सातारा : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat Election) निकाल जाहीर झाले आहेत. 34 जिल्ह्यांमधील जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. याचा 18 जानेवारीला निकाल लागला आहे.

आतापर्यंत शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या भाजप व शिवसेनेने राज्याच्या ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) देखील ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे. मात्र, ग्रामीण भागातील भाजप व शिवसेनेची वाढलेली ताकद काँग्रेस राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी ठरु शकते.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी दत्तक घेतलेले एनकुळमध्ये सत्तांतर झाले असून येथे भाजपने मुसंडी मारली आहे. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी विकास सेवा सोसायटीचे सचिव राजू खाडे यांच्या मदतीने ग्रामपंचायत निवडणूकीत पॅनेल टाकून नऊ पैकी सहा जागा जिंकून इतिहास घडविला. तर राष्ट्रवादी जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जून खाडे यांच्या गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

शरद पवार यांनी संसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत एनकुळ (ता. खटाव) गाव दत्तक घेतले होते. या गावात गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जून खाडे यांच्या गटाची सत्ता होती. यावेळेस मात्र, गावातील पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे हे पुणे येथे वास्तव्यास असतात. पण त्यांनी गावातील अनेक युवकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे त्यांचा पॅनलचा विजय झाला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ग्रामपंचायत निवडणुका ताकदीनं लढण्याचे आवाहन केले होते. शिवेसेनेचे मंत्री आणि आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात ताकद लावल्यानं शिवसेनेने 3 हजारांहून अधिक ग्रामपंचायंतीवर सत्ता मिळवली आहे. राज्यातील 34 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये शिवेसना पहिल्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER