ग्रा.पं. निवडणूक : मविआच्या तुलनेत भाजपा २० टक्केही नाही; जयंत पाटलांचा दावा

BJP - Jayant Patil

मुंबई :- काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना (Shiv Sena) तिन्ही पक्षांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका लढवल्या. समाधानाची बाब ही की, या सर्व गडबडीत भाजपाचे (BJP) अस्तित्व फार मर्यादित राहिले आहे. महाविकास आघाडीसमोर (Mahavikas Aghadi) भाजपा २० टक्केदेखील नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वांत जास्त जागांवर विजयी झाला, असाही दावा त्यांनी केला.

पाटील म्हणाले, माझ्याकडे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील निकालाची माहिती आहे. १३ हजार २९५ जागांच्या निवडणुका झाल्या आहेत. ३ हजार २७६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली. काँग्रेसला १ हजार ९३८ जागांवर यश मिळाले. भाजपा २ हजार ९४२ व शिवसेना २ हजार ४०६ जागांवर विजयी झाली आहे. हे आकडे बोलके आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातील पक्ष आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वांत जास्त उमेदवार निवडून आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER