पदवीच्या परीक्षा १६ मार्च पासूनच होणार : कुलगुरू डॉ.येवले

Pramod Yewale

औरंगाबाद : शहरात मिनी लॉकडाऊन असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. १६ मार्चपासून परीक्षा होणार असून कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.

लॉकडाऊनदरम्यान, विद्यापीठाने संबंधित केंद्र व महाविद्यालयांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनाची काळजी घेण्याचे व सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. एखादा विद्यार्थी आजारी आढळल्यास त्याची वेगळी बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी स्पष्ट केले आहे.

‘पेट’ची मॉक टेस्ट मोबाईल, लॅपटॉपवरही देता येणार

विद्यापीठाच्यावतीने ऑनलाईन पीएचडी एंट्रन्स टेस्ट अर्थात पेट (पेपर दुसरा) शनिवारी १३ मार्चला घेण्यात येईल. ६ हजार ३८३ विद्यार्थी पहिला पेपर उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना ही ११ व १२ मार्च रोजी मॉक टेस्ट देणे गरजेचे आहे. ही मॉक टेस्ट विद्यार्थ्यांना पहिला पेपरप्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप किंवा कॅम्प्युटरवर देता येईल, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER