पदवीधर आणि शिक्षण मतदार संघ महाविकास लढविणार : ना. सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर :- राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील सर्व राज्यातील निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येवून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढविणार आहेत. पुणे विभागातील काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.५) होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्रक्ष सतेज पाटील (Satej Patil) यांनी मंळवारी दिली.

ना. सतेज पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मुदत १९ जुलै रोजी संपली आहे. कोरोना (Corona) संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलल्या. आता दोन्ही मतदार संघातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी लढविणार आहे. कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणत्या विभागातील जागा येणार याबाबत दोन दिवसात वरिष्ठ पातळीवर निर्णय होवून जाहीर केल्या जातील.दरम्यान, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के.पाटील गुरूवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील इच्छुकांच्या एच. के. पाटील मुलाखती घेवून मते जाणून घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER