पदवीधर निवडणूक : विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या; अनिल देशमुखांची टीका

Anil Deshmukh

मुंबई :  विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाल्यानंतर, त्यातच राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवारांनी बाजी मारल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एका हिंदी सिनेमाच्या गाण्याच्या ओळी शेअर करत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?… ये ना पुछो, असं म्हणत विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या, अशी खोचक टीका अनिल देशमुख यांनी केली आहे. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आता तरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी. ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत, असं देशमुख यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात स्पष्ट कौल देणाऱ्या महाराष्ट्रापुढं आम्ही नतमस्तक आहोत. सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले; आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवले. कालही आम्ही जनतेपुढे विनम्र होतो, आजही आहोत आणि सदैव राहू, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पदवीधर, शिक्षक निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

तर ट्विट करत अनिल देशमुख यांनी भाजपवर खोचक टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER