पदवीधर निवडणूक : सलग तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार सज्ज

Satish Chavan

औरंगाबाद : कोरोनामुळे (Corona) लांबणीवर पडलेल्या राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. १ डिसेंबरला त्यासाठी मतदान पार पडणार आहे. अशास्थितीत औरंगाबाद (Aurangabad) पदवीधर निवडणुकीसाठी मोठी चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपमध्येच (BJP) खरी लढत बघायला मिळणार असली, तरी वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि मेष्टा संघटना आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण (Satish Chavan) हे सलग तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात ‘सहविचार सभा’ घेण्यासही सुरुवात केली आहे. तर भाजपकडून शिरीष बोराळकर यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. बोराळकर यांचा गेल्या निवडणुकीत सतिश चव्हाण यांनी पराभव केला होता. त्यामुळे बोराळकर आता अधिक आक्रमकपणे कामाला लागले आहेत.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवारात होणार आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश इंगे मैदानात उतरणार असल्याची असल्याची माहिती पुढे येत आहे. तर मेष्टा संघटनेकडून संजय तायडे निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसने आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER