पदवीधर निवडणूक 2020 : पुण्यात भाजपला धक्का, राष्ट्रवादीची मुसंडी

NCP & BJP

पुणे :- शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातून भाजपला धक्का बसला आहे. पुण्यात भाजप पिछाडीवर आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अरुण लाड यांनी मुसंडी मारली आहे.

पुणे (Pune) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीला दुपारी 3 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. निकालाचा पहिला प्रथम पसंतीचा कल हाती आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख पिछाडीवर आहे. तर, शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे नेते जयंत आसगावकर यांची आघाडी कायम आहे.

पुण्यात खरी लढत भाजपचे संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) आणि राष्ट्रवादीचे अरूण लाड यांच्यात आहे. जो पक्ष जास्त मतदान घडवून आणेल त्याचा विजय निश्चित समजला जाणार आहे. पण मनसेच्या रूपाली पाटील यांनी जास्त मतं घेतली तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो. पुणे पदवीधरमधून मागील वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) विजयी झाले होते. पण ते आता कोथरूडमधून विधानसभेत गेल्याने यावेळी सांगलीचे संग्राम देशमुख भाजपतर्फे मैदानात आहेत. तर राष्ट्रवादीकडून गेल्या वेळी थोड्याफार फरकाने पराभूत झालेले अरूण लाड पुन्हा नशीब आजमावत आहेत.

दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच लागणार की पुढील फेऱ्याची मतमोजणी करावी लागणार याबाबतचे चित्र पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षकसाठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकते, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : विधान परिषद निवडणूक मतमोजणी : नागपूर, पुण्यात महाविकास आघाडी पुढे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER