पदवीधर मतदार संघ : मनसेसाठी पुण्यात राज ठाकरे मेळावा घेण्याची शक्यता

Raj Thackeray

मुंबई : पुणे पदवीधर मतदार संघातील मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील (Rupali Patil) यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात मेळावा घेण्याची शक्यता आहे. ते स्वतः या मतदार संघावर लक्ष ठेवून आहेत.

हा मतदारसंघ भाजपाचा (BJP) पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दोन वेळा या मतदार संघातून निर्वाचित झाले आहेत. रूपाली मैदानात उतरण्याआधी ही लढत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अरुण लाड आणि भाजपाचे संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) यांच्यात सरळ होईल असे चित्र होते पण, रूपाली मैदानात उतरल्याने ही लढत तिरंगी झाली असून चुरशीची होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की भाजपा प्रमाणे मनसेनेही (MNS) या निवडणुकीसाठी सुनियोजित काम सुरु केले होते. मनसेने मोठ्या संकेत मतदार नोंदणी केल्याची चर्चा आहे. हा मतदार संघ श्री आणि ग्रामीण भागातील पाच जिल्ह्यात विखुरलेला आहे. पुण्यात सर्वाधिक मतदारांची नोंदणी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER