पदवीधर मतदारसंघ निवडणूक : राज ठाकरेंनी रुपाली पाटील याना दिल्या शुभेच्छा

Raj Thackeray - Rupali Patil

मुंबई : पुणे पदवीधर (Pune Graduate Constituency Election) मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी दिवाळीनिमित्त पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी रुपाली यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी-शिक्षकांचे प्रश्न ते निवडणुकीचा प्रचार यांसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. राजसाहेबांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. पदवीधरांची नोंदणी किती झाली, त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, या सगळ्या विषयांची माहिती घेतली, असे रुपाली पाटील म्हणालात.

पदवीधर, शिक्षकांसाठी काय करायचे, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, हे राजसाहेबांनी सांगितल. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर आहे. शिष्यवृत्तीपासून अनेक विद्यार्थी वंचित राहतात, त्यासाठी काय पावले उचलणे गरजेचे आहे, हे देखील राजसाहेबांनी सांगितलं, असे त्या म्हणाल्या.

तुला विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खूप काम करायचे आहे. विजयी हो, या शब्दात राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

या मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख हे शिक्षणसम्राट आहेत. राज्यातल्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदार संघांची निवडणूक १ डिसेंबर रोजी होणार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास रुपाली पाटील इच्छुक होत्या. मात्र, या ठिकाणी मनसेने अजय शिंदे यांना उमेदवारी दिली, त्यामुळे रुपाली पाटील नाराज झाल्या होत्या. मात्र पक्षाचा आदेश मानून त्यांनी अजय शिंदे यांचा जोरदार प्रचार केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER