पदवीधर मतदार संघ : अमोल कोल्हे यांचे नाव मतदार यादीत नाही !

Amol Kolhe

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नावनोंदणी करूनही खा. अमोल कोल्हे यांचे नाव मतदार यादीत आले नाही. ते मतदानापासून वंचित राहिलेत.

या संदर्भात उलेखनीय आहे की, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) हे सुद्धा उतरले आहेत. साताऱ्यातील शिवाजी कॉलेजमध्ये बिचकुले मतदान करण्यासाठी आले. मात्र त्याचेही नाव मतदार यादीत नव्हते.

मतदार यादीत नाव नसल्याचे कळताच बिचुकले यांनी संताप व्यक्त केला आहे. अरे, नाव नाही मामा माझे यादीत! जिथे उमेदवाराचेच नाव नाही तिथे सर्वसामान्य मतदारचे काय होईल, असे बिचुकले म्हणालेत.

शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या बाबतीत देखील असेच झाले. पुणे पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नावनोंदणी करूनही मतदार यादीत नाव न आल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER