पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक : यंत्रणा सज्ज

EVM

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मंगळवारी (दि. 1) सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करत ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक साहित्य तालुकास्तरावर पाठविण्यात येत असून सोमवारी (दि. 30) तहसील कार्यालयातून मतदान कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होणार आहेत.

पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही मतदारसंघसाठी 54 मायक्रो ऑब्झर्व्हर्स नेमण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘पदवीधर’साठी 2300 टपाली मतदान झाले आहे. ‘शिक्षक’ साठी निवडणूक कर्मचारी म्हणून शिक्षकांची नियुक्ती केलेली नाही. यामुळे या मतदारसंघात टपाली मतदान नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेतली जाणार आहे मतदान केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज, फेसशील्ड, सॅनिटायझर, एन 95 मास्क आणि साबण उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पदवीधर मतदार संघ जिल्हानिहाय मतदार

पुणे – एक लाख ३६ हजार ६११,
कोल्हापूर – ८९ हजार ५२९,
सांगली – ८७ हजार २३३,
सातारा – ५९ हजार ७१
सोलापूर – ५३ हजार ८१३

शिक्षक मतदार संघ जिल्हानिहाय मतदार

पुणे – ३२ हजार २०१,
सोलापूर – १३ हजार ५८४,
कोल्हापूर – १२ हजार २३७,
सातारा – सात हजार ७११
सांगली सहा हजार ८१२

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER