काळजी करू नका, रस्त्यावरचे लाईट्स किंवा घरातले विजेचे उपकरण बंद करायचे नाहीत – केंद्र सरकार

Govt responds amid concerns grid will fail if lights switched off over PMs request

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ५ एप्रिलला सर्वांनी नऊ मिनिटांसाठी घरातले लाईट्स बंद करून दिवा, मेणबत्ती किंवा टॉर्च लावण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अनेकांनी विजेच्या तांत्रिक अडचणी निर्माण होतील असे म्हटले. यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधानांनी केवळ घरातले लाईट्स बंद करायला सांगितले आहे. रस्त्यावरचे लाईट्स किंवा घरातील विजेवरील उपकरणे बंद करण्यास सांगितले नाही.

त्यामुळे एकाच वेळी लाईट कमी झाल्यानंतर तांत्रिक अडचणी येणार, अशी जी भीती व्यक्त केली जात आहे तसे होणार नाही. कारण वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना केली आहे. पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (पॉस्को) यासंदर्भात एक प्लॅन तयार केला आहे. पाचही प्रादेशिक लोड डिस्पॅच केंद्रे आणि नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरसह (एनएलडीसी) जेणेकरून ब्लॅकआऊट दरम्यान मागणी अचानक कमी झाली तरीही ग्रीडची वारंवारता कायम राखली जाईल. तसेच राज्य सरकारला गरज पडल्यास वीज वेळापत्रक निश्चित करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात उत्तरप्रदेशचा प्लॅन तयार झाला असल्याचे कळत आहे.

अचानकपणे मागणी कमी झाल्यानंतर काही युनिट्सचे ग्रीड फ्रीक्वेन्सी बंद करण्यासाठी काही उत्पादक युनिट तयार मोडमध्ये ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे एकाच वेळी लाईट्स बंद केले तरी वीज पुरवठ्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत; शिवाय फक्त घरातले लाईट्स बंद करायचे असून विजेचे कोणतेही उपकरण वा रस्यावरचे लाईट्स बंद करण्यास सांगितलेले नाही. असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.