घरगुती विजबिल सवलतीबाबत शासन सकारात्मक : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर : शपथविधी झाल्यापासून गेल्या अकरा महिन्यात राज्य शसनाने अत्यंत खडतर परिस्थितीत योग्य नियोजन करुन कारभार केला आहे. कारोनामुळे (Corona) महसुलात घट झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ६४ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढले. यातूनही सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीत मदतीचा हात दिला. आता सरकारची आर्थिकस्थिती काहीशी सुधारत आहे. घरगुती विज बिलात सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सोमवारी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्यात दिली.

ना. मुश्रीफ म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा साडेबारा कोटी रुपये लागतात. कोरोनामुळे जीएसटी, पेट्रोल-डिझेल वरील सेस, मद्यविक्रीतून मिळणारा महसूल घटला. दरमहा फक्त तीन हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असताना शासनाने कोरोनाचा सामना केला. शेतकऱ्यांसह कष्टकरी समाजाला मदतीचा हात दिला. आता शासनाच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेक सकारात्मक निर्णय होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER