राज्य सरकारकडून ३१ डिसेंबर आणि नववर्ष साजरे करण्यासाठी गाईड लाईन जारी

govt-issues-covid-guidelines-for-31st-december

मुंबई : जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच  राज्य सरकारने ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

यानुसार यंदा नागरिकांनी घराबाहेर न पडता घरच्या घरी साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करावे, अशी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सूचना जारी केली आहे. दरवर्षी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी जगभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ डिसेंबर २०२० आणि नववर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.

 ३१ डिसेंबरला दिवसभर संचारबंदी नसली तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि १ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने अनेक नागरिक घराबाहेर पडतात. मात्र नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी काही नियम

  • नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
  • समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी करू नये.
  • सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
  • मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
  • ६० वर्षांवरील नागरिकांनी आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाणे टाळा.
  • धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये.
  • मिरवणुका काढू नये.
  • धार्मिक स्थळी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा
  • फटाक्यांची आतषबाजी करू नये.

नागरिकांनी ३१ डिसेंबरच्या दिवशी समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करू नये. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिकांनी आणि १० वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER