मराठा आरक्षण संदर्भात केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

Maratha reservation.jpg

मुंबई :- मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) राज्य सरकारने केलेला कायदा रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (SC)दिला होता. आरक्षण देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारला (Center Govt) अधिकार असल्याचंही न्यायालयाने म्हटले होते. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने एक महत्वाचं पाऊल उचलं आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 102 व्या घटनादुरुस्तीबाबत सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्याचे अधिकार अबाधित आहेत, 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे केंद्राने याचिकेत म्हटले आहे.

राज्यघटनेच्या 102व्या घटना दुरुस्तीने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) यादी तयार करण्याचा राज्य सरकारचा अधिकार रद्द होत नाही. महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार करत आहे. त्याच दरम्यान आता केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण १९०२ ते २०२१ (भाग २): आयोग ते राणे समिती, आरक्षणाचा अध्यादेश आणि कॅांग्रेस- राष्ट्रवादीचा पराभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button