जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी चौकशी; ठाकरे सरकारचा निर्णय

Jalyukt Shivar-Uddhav Thackeray

मुंबई : जलयुक्त शिवार (Jalyukt shivar) योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Govt) घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र या योजनेवर कॅगने अहवाल सादर करून ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगानेच ही चौकशी होणार आहे.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी १० हजार कोटी खर्च झाला; मात्र त्याचा कुठलाच फायदा नाही. योजना राबवूनही राज्यात टँकरची संख्या वाढली, भूजलपातळी वाढली नाही, असे या अहवालात म्हटले  गेले  आहे. त्यामुळे या योजनेची कॅगच्या अहवालानुसार चौकशी केली जाणार आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. या चौकशीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : कारशेड कांजुरमार्गला हलवणे चुकीचे, पुराव्यासह फडणवीसांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER