राम मंदिरासाठी हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी दिलेत ११ कोटी

Govindbhai Dholakia donated Rs 11 crore for Ram temple

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिराच्या (Ram temple) उभारणीसाठी गुजरातच्या सूरतमधील हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी ११ कोटी रुपये दान दिले. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात जाऊन गोविंदभाई यांनी ११ कोटींचा चेक दिला. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी (RSS) राम मंदिरासाठी आजपासून देणगी गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

गोविंदभाई ढोलकिया (Govindbhai Dholakia) हे ‘रामकृष्ण डायमंड कंपनी’चे मालक आहेत. अनेक वर्षांपासून संघाशी जुळले आहेत. १९९२ सालापासून गोविंदभाई राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. राम मंदिरासाठी इतकी मोठी देणगी देणारे गोविंदभाई एकटेच नाहीत. सूरतमधील महेश कबूतरवाला यांनी राम मंदिरासाठी पाच कोटींची  देणगी दिली आहे. लवजी बादशाह यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

गुजरातमधून अनेक व्यापाऱ्यांनी ५ ते २१ लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे गोरधन झाडाफीया आणि सुरेंद्र पटेल यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वप्रथम देणगी दिली, असे विहिंपचे आलोक कुमार यांनी सांगितले. राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक आहेत म्हणून निधी संकलनाच्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, असे आलोक कुमार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER