गोविंदा पुन्हा सक्रिय, जाहिरातीत दिसणार

Govinda

हीरो नंबर वन म्हणून बॉलिवूडमध्ये (Bollywood) नाव कमवलेला गोविंदा (Govinda) गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूरच आहे. त्याला कोणी साईनही करीत नाही. मात्र अधे मध्ये तो छोट्या पडद्यावरील शोमध्ये दर्शन देत असतो. गोविंदा एक एंटरटेनर हीरो म्हणून ओळखला जातो. त्याची ही ओळख लक्षात घेऊन एका कंपनीने त्याला आपल्या उत्पादनाच्या ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बनवले आहे. कालच त्याची ही जाहिरीत प्रसारित झाली.

एका क्रेडिट कार्ड पेमेंट कंपनीने बनवलेला हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यापूर्वी या कंपनीने अनिल कपूर, उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्यासोबत जाहिराती केलेल्या आहेत. या जाहिरातीत गोविंदा त्याच्या नेहमीच्या शैलीत नाचताना दिसत असून जाहिरातीच्या शेवटी येणारा पंच गोविंदाची खरी ओळख पटवणारा असून तीच या कंपनीची जाहिरातही आहे.

ही बातमी पण वाचा : मुळशी पॅटर्नच्या रिमेकचे नाव पुन्हा बदलले 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER