कोरोना निगेटिव्ह आल्याने गोविंदाने त्याच्या शैलीत साजरा केला आनंद

Maharashtra Today

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. प्रख्यात अभिनेता गोविंदालाही (Govinda) कोरोनाची लागण झाली होती. त्याने स्वतःच सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. मात्र आता गोविंदा कोरोनामुक्त झाला असून याचा आनंद त्याने त्याच्या स्टाईलने साजरा केला.

कोरोना निगेटिव्ह येण्याचा आनंद साजरा करतानाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला. गोविंदाने ८० आणि ९० चे दशक गाजवले होते. उत्कृष्ट डान्स आणि अफलातून टायमिंग साधत कॉमेडी करणारा गोविंदा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याचे बहुतेक सर्व सिनेमे सुपरहिट झाले होते. त्याच्या ‘कुली नंबर वन’चा डेव्हिड धवनने (David Dhavan) वरुण धवनला (Varun Dhavan) घेऊन रिमेक केला; पण हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला होता. सिनेमापासून दूर असला तरी गोविंदा सध्याही विविध कारणांमुळे चांगलाच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील रियालिटी शोमध्ये तो भाग घेत असतो. अशा या गोविंदाने कोरोनाची लाट आल्यानंतर कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली होती. असे असतानाही काही दिवसांपूर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

मात्र त्याला गंभीर लक्षणे नसल्याने तो घरातच क्वारंटाईन झाला होता. गोविंदाने गुरुवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तो दरवाजा खोलून बाहेर येताना आणि पुन्हा दरवाजा बंद करताना दिसत आहे. माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे असेही त्याने या व्हिडीओत सांगितले आहे. मी आता क्वारंटाईन नाही हेच त्याला यातून सुचवायचे आहे. या व्हिडीओसोबत गोविंदाने लिहिले आहे, ‘अपुन आ गयेला है।’ अभिनेत्री नगमालाही आता कोरोनाची लागण झाली असून रणबीर कपूर, परेश रावल, संजय लीला भंसाळी, आमिर खान, आर. माधवन, अक्षयकुमार, आलिया भट्ट, मिलिंद सोमण यांच्यासह काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button