बॉलिवूडमध्ये विरोधात कारस्थाने केल्याचा गोविंदाचा आरोप

Govinda

बॉलिवूडमध्ये (Bollywood news) बाहेरच्या कलाकारांना काम मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. संघर्षानंतर जर त्याला यश मिळाले तर तो पुन्हा जमिनीवर कसा येईल असेही प्रयत्न बॉलिवूडमधील काही लोक करीत असतात. आजवर अनेकांनी हे अनेक वेळा सांगितलेले आहे. गोविंदाही (Govinda) असाच बाहेरून बॉलिवूडमध्ये आलेला अभिनेता. मात्र अभिनय, डांस, विनोदाचे टायमिंग याच्या बळावर त्याने बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळवले. एकाच वेळेस ८-१० सिनेमात तो काम करीत असे. त्याच्या या कामाचे अनेक किस्से आहेत. मात्र यशाच्या शिखरावर असताना त्याचे पाय ओढण्याची कारस्थाने केल्याचा आरोप आता गोविंदाने केला आहे. मात्र त्याने कोणाचीही नावे घेतलेली नाहीत.

विरारच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गोविंदा बॉलिवूडमध्ये आला आणि प्रचंड यशस्वी झाला. त्याने एकाहून एक सरस हिट सिनेमे दिले. सध्या तो सिनेमात दिसत नसला तरी स्फोटक वक्तव्ये करून तो चर्चेत राहात असतो. आताही त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत गोविंदाने म्हटले आहे, बॉलिवूडमध्ये मी यशस्वी होतो पण माझ्याविरोधात कारस्थाने करण्यात आली. माझ्या सिनेमांना थिएटर मिळू नये यासाठी काही जण प्रयत्न करीत होते. थिएटर मिळाली नाहीत तर माझा सिनेमाच रिलीज होणार नाही आणि मी मागे फेकला जाईन असे त्यांना वाटत होते. जेव्हा नशीब आपल्याविरोधात असते तेव्हा आपल्या जवळचे नातेवाईकही विरोधात जातात. गेल्या १४-१५ वर्षात मी पैशांची गुंतवणूक केली. पण लोकांनी मला फसवले. यात माझे जवळ जवळ १६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. काही जणांनी तर माझ्याशी खूपच वाईट वर्तन केले.

याच मुलाखतीत गोविंदाने तो आता दारु पिऊ लागला आहे, सिगरेट ओढू लागला आहे आणि पार्ट्याही करू लागला आहे असे म्हटले आहे. गोविंदाला जेव्हा आता तू पूर्वीपेक्षा जास्त आध्यात्मिक झाला आहेस का असा प्रश्न विचारला असता त्याने सांगितले, ‘नाही. याच्या अगदी उलट मी वागू लागलो आहे. मी आता जास्त भ्रष्ट झालो आहे. सध्या मी पार्ट्या करतो, दारु पितो आणि सिगरेटही ओढतो. जुना गोविंदा खूप पवित्र होता. भावुक होता. मात्र माझ्या भावुकपणाचा अनेकांनी गैरफायदा घेतला. आता मी भावुक नाही. आता मी प्रॅक्टिकल झालो असून आता सगळीकडे एक व्यवसाय म्हणूनच बघतो असेही गोविंदाने म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER