देशात दोनच राज्यांत राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे… – संजय राऊत

Sanjay Raut.jpg

मुंबई :- देशातील दोनच राज्यांत राज्यपाल नियुक्त आहेत, असा टोला शिवसेना नेते खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्येच राज्यपाल आहेत, असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारला चिमटा काढला आहे. राज्यात मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र लिहिले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही जशास तसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले. यावरून सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद निर्माण झाला आहे .

राज्यपाल हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच, राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरून राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असल्याचेही राऊत यांनी म्हटले. त्यानंतर, पुन्हा एकदा राऊत यांनी मोदी सरकारला राज्यपालांच्या भूमिकेवरून लक्ष्य केले.

देशात केवळ दोनच राज्यांत राज्यपाल आहेत, एक महाराष्ट्रात आणि दुसरे पश्चिम बंगालमध्ये, असे राऊत यांनी म्हटले. राज्यपाल हे भारत सरकार आणि राष्ट्रपतींचे पॉलिटकल एंजट असतात; कारण ते राजकीय काम करतात. सध्या महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी सरकार आहे, म्हणून देशातील या दोनच राज्यांत राज्यपाल असल्याचा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER