सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन

Bhagat Singh Koshyari

मुंबई : दिवंगत उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अभिवादन केले.

देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने राज्यपालांनी इंदिरा गांधी यांच्याही प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी व उपस्थित पोलीस जवान यांचेसह राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.

देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याची शपथ यावेळी देण्यात आली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव श्वेता सिंघल, खासगी सचिव उल्हास मुणगेकर तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER