राज्यपाल vs ठाकरे सरकार वाद पेटणार, प्रवीण दरेकर आक्रमक; मुनगंटीवारांचीही प्रतिक्रिया

Koshyari-CM Thackeray-Praveen Darekar-Sudhir Mungantiwar

कोल्हापूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि महाविकास आघाडी सरकार यांमध्ये विधानपरिषदेच्या १२ जागांच्या नियुक्त्यांचा वाद सुरू आहे. त्यातच आणखी एक वादाचा प्रसंग पुढे आला आहे.

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नाही. राज्यपालांना सरकारने हवाई प्रवासाची अनुमती दिली नाही, त्यामुळे विमानातून उतरून त्यांना राजभवानावर परतावे लागले. याप्रकरणी विरोधी पक्षांकडून राज्य सरकारविरोधात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या सरकारने सूड भावनेचा अतिरेक केला, अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी (Praveen Darekar) सरकारवर टीकास्त्र सोडले.

राज्यपालांवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

राज्यपालांचे विमान सरकारच्या माध्यमातून नाकारणे हे दमनकारी आहे. लोकशाहीत हे होणे योग्य नाही. याबाबत सरकारने स्पष्टीकरण देऊन विषय थांबवावा. अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. विमानात तांत्रिक अडचण होती, असा खुलासा देऊन हा विषय संपवावा. मात्र, जाणीवपूर्वक केले असेल तर गंभीर बाब आहे, असेही ते म्हणाले. “याबाबत मला माहिती नाही, मंत्रालयात जाऊन झालेल्या प्रकाराची माहिती घेऊन सांगणार.” असे अजित पवार म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हिमकडा कोसळलेल्या दुर्घटनेची पाहणीसाठी जाणार असल्याची माहिती आहे. आधीच कोश्यारींनी या घटनेविषयी खेद व्यक्त केला आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER