‘आरोग्यदीप’च्या कोरोना विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Governor releases Karona special

‘महाराष्ट्र आरोग्यदीप’ या आरोग्यविषयक वार्षिकाच्या कोरोना विशेषांकाचे प्रकाशन आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या विशेषांकामध्ये नामवंत डॉक्टर्स व विशेषज्ञांच्या कोरोना व्यवस्थापनावर लेखांचा समावेश असल्यामुळे आरोग्यदीपचा अंक ज्ञानवर्धक व वाचनीय झाला असल्याचे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

कोरोनामुळे लोक अनावश्यक भयभीत झाले असल्याचे नमूद करून डॉक्टरांनी जनसामान्यांचे कोरोनाविषयक गैरसमज दूर करून त्यांना आत्मविश्वास द्यावा, अशी सूचना राज्यपालांनी उपस्थित डॉक्टरांना केली. योग्य खबरदारी व आत्मविश्वास यांच्या मदतीने आपण कोरोनाला निश्चितपणे पराभूत करू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाचे मधुमेह व थायरॉईडवर होणारे परिणाम, होमिओपॅथीच्या माध्यमातून कोविडशी लढा, अतिदक्षता विभागातील कोविड रुग्णांचे व्यवस्थापन, कोविड आणि नेत्र आरोग्य, कोविडमध्ये आरोग्य दक्षता, मानसिक आरोग्य आणि कोविड, यांसह अनेक लेखांचा विशेषांकात समावेश करण्यात आला आहे. डॉ. दीपक पाटकर, डॉ. दीपक नामजोशी, डॉ. पिनाक दंदे, डॉ. स्वप्नेश सावंत, डॉ. परेश नवलकर, डॉ. जॉय चक्रवर्ती, डॉ. राजेश राव, मुद्रक आनंद लिमये आदी यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER