कोकणातील सिंचन निधीसाठी राज्यपाल सकारात्मक

रत्नागिरी : कोकणातील सिंचनासाठी (irrigation in Konkan) तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा या मागणीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यपाल यांनी अप्पर मुख्य सचिव आणि नियोजन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. याबाबतचे पत्रही दिल्याची माहिती माजी मंत्री शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिली.

सिंचनाच्या बाबतीत कोकणावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी 11 ऑगस्ट रोजी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यपालांना कोकण विभागाच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र पाच हजार कोटींचा निधी मंजूर उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन दिले होते.

स्वातंत्र्यानंतर कोकणात फक्त 1.5 टक्के सिंचन झाले असून पश्चिम महाराष्ट्रात 50 टक्के सिंचन झाले आहे. कोकण सुजलाम सुफलाम करण्यासाठी कोकणातील धरणांच्या कामांसाठी निधी मिळत नाही. मात्र कोकणच्या हक्काचे असलेल्या कोयनेच्या अवजलापैकी फक्त 10 टी.एम.सी. कोकणाला देऊन 57.5 टक्के इतरत्र घेऊन जाण्याचा घाट सुरू आहे, ही बाब त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER