राज्यपाल डेहराडून दौऱ्यावर, महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट लांबणीवर

Governor Bhagat Singh Koshyari - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण, काल भाजपच्या नेत्यांना भेट देणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांची भेट टाळल्याची चर्चा आहे. राज्यपालांचा डेहराडून दौरा नियोजित असल्याने तूर्तास ही भेट लांबणीवर(governor-on-a-visit-to-dehradun-meeting-of-leaders-of-mahavikas-aghadi-postponed) गेली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकासआघाडी सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार होते. यासाठी भेटीची वेळही मागण्यात आली होती. यावेळी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींसंदर्भात महाविकासआघाडी सरकारकडून स्वत:ची बाजू मांडली जाणार होती. मात्र, राजभवनाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. ते २८ मार्चपर्यंत देहरादूनमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांना आणखी काही काळ राज्यपालांच्या भेटीसाठी वाट बघावी लागणार आहे. यावरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत. तुर्तास ही भेट लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आगामी तीन दिवसांत काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार का, याकडे सर्वांच्य नजरा लागल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : राज्यपालांच्या माध्यमातून भाजपला सत्ता गाजवायचीय, त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल ; शिवसेनेचा घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER