राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

Ram Vilas Paswan - Governor Bhagat Singh Koshyari

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

केंद्रीय मंत्री श्री राम विलास पासवान यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पासवान हे व्यापक जनाधार असलेले बिहार राज्यातील लोकप्रिय नेते होते. केंद्रातील अनेक सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून कार्य करताना विविध खाती समर्थपणे सांभाळली. पासवान यांचा आणि माझा घनिष्ट परिचय होता. त्यांच्या निधनामुळे देशाने एक उत्तम संसदपटू आणि लोकप्रिय नेता गमावला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या शोक संवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER