रोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

Governor mourns Rosa Deshpande's death

महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ साम्यवादी नेत्या श्रीमती रोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. श्रीमती रोझा देशपांडे यांच्या निधनाचे वृत्त समजुन वाईट वाटले. आपले वडिल, ज्येष्ठ साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्याकडून प्राप्त झालेला समाजसेवेचा वसा त्यांनी आयुष्यभर निष्ठेने चालविला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात तसेच गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. महिला तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER