सरकारी कार्यालयांवर १५ दिवसांत तिरंगा फडकवा; राज्यपालांचे आदेश

जम्मू :- जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर आता केंद्रशासित करण्यात आला आहे. त्यानंतर नायब राज्यपालांकडून (Governor Manoj Sinha) जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयांत तिरंगा ध्वज फडकवण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र ध्वज स्वीकारण्यात आला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० असताना तेथे लाल रंगाचा स्वतंत्र ध्वज स्वीकारण्यात आला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी अनुच्छेद ३७० हटवून त्याचे विभाजन करण्यात आले. आता तेथील नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काही निर्देश दिले आहेत. देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांनी काही सूचना केल्या आहेत.

सरकारी कार्यालयांवर तिरंगा
विभागीय आयुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली. नायब राज्यपाल सिन्हा यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आगामी १५ दिवसांत भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जनतेला देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींची ओळख करून त्यांचे तपशील सादर करण्याचे निर्देश नायब राज्यपालांनी दिले आहेत. या सर्वांना अमृतमहोत्सवाच्या विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.

दरम्यान, ११ जुलै १९५२ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये विधेयक मंजूर करून स्वतंत्र ध्वजाला मान्यता दिली होती. यामुळे भारताचा आणि जम्मू-काश्मीरचा ध्वज स्वतंत्र झाला होता. भारतीय घटनेच्या अनुच्छेत १४४ नुसार जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र ध्वजाला पुढे मान्यता देण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर आता एक देश, एक ध्वज अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button