…तर राज्यपालांनी १२ आमदारांची यादी दाबून ठेवली; नाना पटोलेंची टीका

Nana Patole-Governor Bhagat Singh

मुंबई :- विधान परिषदेसाठी नामनियुक्त सदस्य म्हणून राज्य मंत्रिमंडळाने १२ जणांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे पाठवली आहेत. मात्र, हा प्रश्न गेल्या सहा  महिन्यांपासून प्रलंबित आहे. या १२ जणांची यादी गहाळ झाल्यामुळे वाद पेटला होता; पण ती यादी राज्यपालांकडे असल्याचा खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे. यावरून राजभवनात किती ढिसाळपणा आहे, हे दिसून येते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

मुंबईत पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांनी राज्यपाल नियुक्त आमदार मुद्दा आणि आरक्षणाच्या मुद्यावर हल्लाबोल चढावला. “राज्यपालांच्या कार्यालयामध्ये किती ढिसाळपणा आहे, हे दिसून आले. गेल्या सहा  महिन्यांपासून यादीवर सही करण्यात आली नाही आणि अचानक यादी गायब असल्याचे सांगण्यात आले. राज्यपाल भवन हे भाजपचे कार्यालय झाले आहे. ‘राज्यपाल म्हणाले मला जोपर्यंत वरून आदेश येत नाही तोवर मी सही करणार नाही.’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. याचा आर्थ राज्यपालांनी ही यादी दाबून ठेवली होती.” अशी टीका नाना पटोले यांनी केली.

आरक्षण हे भाजपचे पिल्लू
“मराठा आणि धनगर आरक्षण हे भाजपचे पिल्लू आहे. या दोन्ही आंदोलनांना पेटवून भाजपा सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे दोन्ही समाज भीक  घालणार नाही.” अशी जळजळीत टीका नाना पटोलेंनी केली.

ही बातमी पण वाचा : हे सरकार आमच्यामुळे आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सेना-राष्ट्रवादीला सुनावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button