कंगना प्रकरणात राज्यपालांची उडी, राज्य सरकारविरोधात केंद्राकडे अहवाल पाठवणार?

governor-jumps-shiv-sena-kangana-dispute

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उडी घेतली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्स रॅकेटवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यामध्ये वाद सुरू आहे.

दरम्यान, राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या कंगना राणौतच्या कार्यालयावर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंगनाला दणका दिला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजॉय मेहता यांना राजभवनात बोलवून भगतसिंह कोश्यारी यांनी नापसंती दर्शवली. कोश्यारी या वादाबाबत केंद्र सरकारकडे अहवाल देण्याची शक्यता असून, त्याबाबतची माहिती राज्य सरकारला देण्याची सूचना राज्यपालांनी केल्याचे वृत्त आहे. तसेच राज्यपाल याबाबत राज्य सरकारविरोधात केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार, असल्याची माहिती टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER