१२ आमदारांची नियुक्ती अद्यापही नाही; मोदींकडे राज्यपालांची तक्रार

Governor Bhagat Singh Koshyari-PM Modi

नवी दिल्ली :- राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या १२ मुद्यांवर आम्ही पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यासोबत चर्चा केली. राज्यात गेल्या ८ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्तीचा मुद्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदींच्या कानी घातला.

गेल्या ८ महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी १२ आमदारांच्या नियुक्तांची यादी राखून ठेवली आहे. यावर त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यात सरकार हे बहुमतात आहे. तरीही याबद्दल निर्णय घेण्यात आला नाही. हायकोर्टात सुद्धा याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारकडून यादी राज्यपालांना दिली आहे, या आमदारांची नियुक्ती कशी करायची ही कायदेशीर बाब यात पूर्ण आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Govt) दिलेल्या १२ आमदारांच्या यादीला हिरवा कंदील दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच स्थानिक स्वराज संस्थेच्या ओबीसी आरक्षण काढून टाकले आहे. यामुळे ५६ हजार जागेवर परिणाम होत आहे. ओबीसीची जनगणना करावी आणि ५० टक्के ही मर्यादा काढून टाकावी, अशी मागणीही पवारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button